नागरिकांशी भेटी दरम्यान साधला सवांद
गोंडपिपरी-
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काँग्रेसच्या पदयात्रेला ३ सप्टेंबर रविवार पासून सुरुवात झाली आहे. दरम्यान गोंडपिपरी तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ राजुराचे माजी नगराध्यक्ष तथा विधानसभा समन्वयक अरुण धोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.खराळपेठ या गावापासून सकाळी ७ वाजता पदयात्रा निघाली.यात्रेत सहभागी राजुरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसह पदयात्रा नियोजित मार्गावरील गावोगावी व गावातील नागरिकांशी भेटी दरम्यान संवाद साधला.
पदयात्रा बोरगाव पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परंतु जनसंवाद साधने महत्त्वाचे असल्याने धोटे यांनी जनसंवाद पदयात्रेत सहभागी झालेल्या संपूर्ण कार्यकर्त्यांसह अख्या पावसात भिजत पदयात्रा काढली व गावागावातील नागरिकांशी संवाद साधला.नागरिकांना अरुण धोटे काँग्रेसची भूमिका पटवून सांगत भाजपने जनतेला खोटे आश्वासन देत कशी फसवणूक केली,पेट्रोल,डिझेल दर वाढवले, बेरोजगारी वाढली,उद्योग महाराष्ट्रातून गेले,महागाई वाढली हे पटवून सांगत भाजपा देश विरोधी आहे लोकशाही विरोधी आहे भाजपा हटाव संविधान बचाव चा नारा देत.सामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याचे आव्हाहन केले.यावेळी तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नगरपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.