चंद्रपूर /प्रतिनिधी :- जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण) चंद्रपूर जिल्ह्याच्या निरीक्षक पदावर नागपूर येथील ज्येष्ठ नेते दिलीप पनकुले यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.या नियुक्तीचे पत्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी माजीमंत्री रमेश बंग,पक्षाचे जेष्ट नेते उपस्थित होते. या नियुक्तीचे जिल्हा चंद्रपूर ग्रामिण जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख,राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे , महीलाध्यक्ष बेबी ऊईके, युवक अध्यक्ष सोमानी, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाघ्यक्ष सुजीत ऊपरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .