अहेरी:तालुक्यातील खांदला ग्राम पंचायत अंतर्गत समाविष्ट रायगट्टा येथे जीर्ण झालेल्या अंगणवाडीत चिमुकल्यांचे शिक्षण सुरू होते. जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीमध्ये चिमुकल्यांच्या जीवाला धोका होता.याची माहिती मिळताच माजी आ.दीपक आत्राम यांनी विशेष प्रयत्न करून अंगणवाडी बांधकामासाठी जिल्हा परिषदेतून निधी खेचून आणली.त्यामुळे रायगट्टा येथील चिमुकल्यांना आता आंगणवडीचे नूतन इमारत मिळाले आहे.
येथील गावकऱ्यांनी सन 2021-22 मध्ये भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस चे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक आत्राम यांच्या कडे नवीन अंगणवाडी इमारत बांधकामाची मागणी केले होती.चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी जिल्हा परिषद येथे पाठपुरावा करून नूतन अंगणवाडी इमारत बांधकमासाठी निधी मंजूर करून घेतली.नुकतेच अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण झाले असून माजी सरपंच सौ शकुंतला माधव कुळमेथे यांच्या हस्ते लोकार्पण करून गावातील चिमुकल्यांना नूतन वास्तू उपलब्ध करून देण्यात आले.
वेळी गावचे पोलीस पाटील सत्यम बंडमवार,माजी सरपंच ज्योतीताई जुमनाके,माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम, माजी उपसरपंच भगवान मडावी,माजी ग्रा. प. सदस्य नारायण कंबगोनीवार,माजी ग्रा.प.सदस्य वंदना अलोने,माजी ग्रा.प. सदस्य महेश्वरी बत्त्तूलवार,माजी ग्रा प सदस्य सुधाकर आत्राम,व्यंकण्णा कडार्लावार,नागेश चिंतावार,रामशंकर ,अंबलीपवार,नारयण चिटकला, संतोष मोहूर्ले,रज्जू मोहूर्ले,रमेश पोरतेट, लक्ष्मण पोरतेट, संपत चिटकला,दुर्गाजी आलाम, ग्रामसेविका संतोषी सडमेक, अंगणवाडी सेविका रेखा पुण्यमूर्तीवर,मदतनीस छाया तलांडे आदी उपस्थित होते.