वरोरा :- समाजात व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाटताना दिसून येत आहे. खर्रा, गुटका, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन मोठा प्रमाणात ग्रामीण व शहरी भागात केल्या जात आहे आणि त्याचे दुषपरिणाम सुद्धा जानवायला लागले, या गंभीर विषयावर जनजागृती करून मुखाचा कर्करोग तसेच मासिकपाळी तपासनी, स्थनाचा कर्करोग तपासणी, एच आय वी व गुप्त रोग रक्त तपासणी करिता टाटा ट्रस्ट, चंद्रपूर, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, उप जिल्हा रुग्णालय, वरोरा व अंबुजा सिमेंट फाऊंडेशन यांच्या मदतीने वरोरा तालुक्यातील बोरगाव भोसले येथे आरोग्य तपासणी शिबिराचे दिनांक १७ ऑगस्ट ला आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद बोरगाव चे उपसरपंच नरेश हरणे यांनी भूषविले तर कॅन्सर विषयी मार्गदर्शन टाटा ट्रस्ट चे वैद्यकीय अधिकारी डॉ.ट्वींकल ढेंगळे यांनी गर्भाशय व स्थनाचा कर्करोग चे लक्षणे व काळजी यावर माहिती दिली. आयसीटीसी चे समुपदेशन गोविंद कुंभारे यांनी HIV/AIDS व गुप्तरोग या विषयी माहिती देताना त्या पासून बचाव कसा करायचा व निरोध चे महत्व विशद केले. तर CHO प्रियांका वाघमारे यांनी मधुमेह व उच्च रक्तदाब यावर माहिती दिली व तपासणी करून औषधं वाटप केले. ज्योती मुरमाळकर, वैष्णवी सहारे (टाटा ट्रस्ट) यांनी तपासणी केली. तर शिबिरास प्रणाली सोनटक्के लिंक वर्कर, आरोग्य सोविका खोब्रागडे अंबुजा फाउंडेशन चे व्यवस्थापक विश्वास गुल्हाने व शुभम भुते, साजन शेंडे यांनी सहकार्य केले.