संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सत्तेला सुरूंग लावणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी धांदरफळ इथल्या सभेनंतर उसळलेल्या दंगलीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“वसंतराव देशमुख यांचे विधान सभेत आले नसते, तरी सुजय विखे, माझ्यावर किंवा आमच्या कार्यकर्त्यांना हल्ला करण्याचा कट आखला होता”, असा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे.
संगमनेरमधील निवडणूक यंदा राज्यात गाजत आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सत्तेला विखे परिवाराच्या ताकदीवर अमोल खताळ या तरुणांनी लावले आहे. बाळासाहेब थोरात यांचा तब्बल दहा हजार मतांनी पराभव करत अमोल खताळ आमदार झालेत. निवडणुकीकाळात संगमनेरमधील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. यात धांदरफळ इथला सुजय विखे यांच्या सभेत समर्थक वसंतराव देशमुख यांनी महिलांचे, विशेष करून जयश्री थोरातांविषयी खालच्या पातळीवर टीका केली.
यानंतर संगमनेर दंगल उसळली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. या दंगलीवर आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांनी मोठे भाष्य केले आहे. आमदार खताळ यांनी ‘सकाळ माध्यम समूह’च्या साम टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी दंगलीबाबत गंभीर भाष्य करत बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमधील दहशतीवर बोट ठेवले आहे.
आमदार खताळ यांनी म्हटले आहे की, “धांदरफळ खुर्द हे माझं गाव आहे. धांदरफळ सभेतील विधान हे दुर्दैव्य होते. मी देखील त्याच सभेत होतो. पण ते वक्तव्य आले. त्या विधानाचे खंडन सुजय विखे यांच्यासह आम्ही सर्वांनी केले होते. परंतु या विधानाला आलेली रिअॅक्शन अपेक्षित नव्हती. कायद्याचा राज्य आहे. तक्रार द्यायची हवी होती”. परंतु ती रिअॅक्शन ‘प्री-प्लॅन’ होती. देशमुखांचे विधान आले नसते, तरी त्या कार्यक्रमामध्ये, सभेत सुजय विखे, माझ्यावर किंवा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप खताळ यांनी केला.
आमदार खताळ यांनी संगमनेरमध्ये पाणीप्रश्न, भयमुक्त संगमनेर, रोजगारासाठी एमआयडी या प्रमुख तीन मुद्यांवर काम करणर आहे. तसेच संगमनेरमधील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत रस्ते करणार असल्याचा संकल्प केला आहे. साकूर पठार भागात, तळेगाव निमून 40 वर्षांपासून लोकप्रतिनिधी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. हे पाटबंधारे मंत्री असताना 2005 मध्ये समन्यायी पाणी वाटपाचा अन्यायकारक निर्णय झाला. निवडणुकीच्या काळात देखील पाण्याचे टँकर सुरू होते. पाण्याचा प्रश्न जाणिवपूर्वक संगमनेरमध्ये निर्माण केला गेलाय. निळवंडे धरणातील कालव्यांचा प्रश्न साईबाबांच्या आशीर्वादामुळे विखेंनी सोडवला. संगमनेर शेजारच्या अकोले या आदिवासी तालुक्यात आमदार किरण लहामटे यांनी थोरातांच्या मागून येऊन तिथं एमआयडीसी मंजूर करून घेतली. मात्र युवकांना संगमनेरमध्ये एमआयडीसी नाही. रोजगारासाठी प्रयत्न हवे आहेत. संगमनेरमध्ये उपजिल्हा रुग्णालयासाठी लढणार, असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.