अहेरी: स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून अहेरी तालुक्यातील शहीद जवानांच्या बलिदानाचा मान राखून व त्याची जाणीव ठेऊन त्यांच्या बलिदानाचा गौरव करून अहेरी येथील रुक्मिणी महालात शहीद जवानांच्या कुटुंबियांना शाल व श्रीफळ आणि साडी भेट देऊन त्यांचा सन्मान माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
आपण आपल्या माणसांना दूर जाताना पाहणे खरच खूप वेदनादायक असते आणि याच बरोबर त्यांना भावपूर्ण अभिवादन देणे सुध्दा कुटूंबियांसाठी सर्वात कठीण प्रसंग असतो परंतु जीवन मरण हे अटळ आणि रोखता न येणारे एक सत्य आहे, ज्याला आपल्याला कधी ना कधी सामोरे जावेच लागते.
परंतु देशाकरिता आपले तन मन धन समर्पीत करून फक्त देशहीतातच माझे सौख्य सामावले आहे समजून छाती समोर करून देशाच्या शत्रु सोबत लढा देता देता आपले प्राण सोडतात आणि देशासाठी शहीद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांचा मान राखायाला पाहिजे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.
शरीर म्हणजे एक भाड्याचे घर आहे ज्याला आपल्याला कधी ना कधी सोडावेच लागते. जीवन मरण तर आपल्या हातात नाही परंतु जगणे आपल्या हातात आहे आपण कसे जगतो आणि कसे लोकांशी वागतो हे खूप महत्वाचे आहे. पण हे जरी कितीही खरे असेल तरी पण आपण एक माणूस आहोत आपल्याला भावना आहेत. आपण ज्या व्यक्ति बरोबर राहिलो जगलो अश्या व्यक्तींना दूर जाताना पाहणे अत्यंत दुःखदायक असतेच त्यामुळे शहीद जवानांना अभिवादन करतो. आणि त्यांची जागा इतर कोणी घेऊ शकत नाही ती ऊणीव कोणी भरु शकत नाही हे कटू सत्यच आहे असे म्हटले.यावेळी शहीद जवानांचा कुटुंबीयांनी त्यांच्या समस्या राजें पुढे मांडल्या.शासन निर्णय असून सुध्दा शासन कडून दहा लाख रुपये मिळाले नाही, पाच एकर जमीन मिळाली नाही,मुलांना शिक्षणासाठी मोफत बस सुविधा मिळत नाही अशा विविध समस्या राजें पुढे मांडल्या.
यावेळी भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.