गोंडपिपरी (सुरज माडुरवार) :- गोंडपिपरी पोलीस स्टेशनला गुरुवारी बोरगाव येथील शेकडो नागरिकांनी धडक देत गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.बोरगावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून महिलांना मध्यपी नेहमी शिवीगाळ करत असतात महिला असुरक्षित असून विध्यार्थी देखील दारू विक्रीत गुंतले आहे.गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आले असून पोलीस विभागाने कारवाया कराव्या या मागणीला घेऊन गावातील बचत गटाच्या महिला, तंटामुक्त समिती,ग्रामपंचायत कमिटी संयुक्तरित्या पोलीस स्टेशनला धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदार जीवन राजगुरू,पीएसआय मोगरे यांना निवेदन दिले.गावात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून मुख्य व्यवसाय मजुरी व शेतीच्या उत्पन्नातूनच आपली उपजीविका करून अगदी गुण्या गोविंदाने सर्व नांदतात.मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी जेव्हापासून उठली तेव्हा पासून गावात अवैध दारूविक्री मुळे शांतता भंग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गावातीलच काही व्यक्ती हा अवैध दारूविक्री धंदा करीत असून सुखाने नांदणारे संसार आज घडीला उघड्यावर आले आहेत याचा कमालीचा त्रास हा महिलांना सहन करावा लागत असल्याने गावात दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मागणीचे निवेदन ठाणेदारांना दिले.यावेळी तमुस अध्यक्ष विकास पंदिलवार,सरपंच ललिता बोरकुटे,तमुस सदस्य सरोजनी फुलझले,योगिता रामटेके,राजू गेडाम,ग्रा.पं सदस्य अमावशा निमसरकर,रेखा भसारकर,आदेश निमसरकर यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती