वरोरा :- शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी तसेच जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न व्हावे, आणि शेतकरी सधन व्हावा याकरिता माहिती देण्यासाठी महारोगी सेवा समिती द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठ अकोलाशी संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविदयालयाच्या ग्रामीण कृषिकार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत जामगाव (बु.) येथे कृषिकन्यांचे झाले आगमन.
गावातील माजी सरपंच लक्ष्मण ठेंगणे, तसेच इतर रहिवासी निलेश ठेंगणे, ईश्वर आसूटकर, अविनाश तुराणकर, अक्षय ताजणे, विजय तुराणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व रहिवासी यांनी या कृषीकन्यांचे स्वागत केले.
शेतकऱ्यांना चारा प्रक्रिया, माती परिक्षण, जनावरांसाठी लसीकरण, मोबाइल अँप चा वापर कसा करावा, तन नियंत्रणासाठी पद्धती, पिकासाठी योग्य खताचा वापर कसा करावा, फळबागांची लागवड व इतर नैसर्गिक आपत्तींची काळजी कशी घ्यावी यासाठी मार्गदर्शन करण्याचा कृषिकन्यांचा प्रयत्न असणार.
या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाकरिता आनंद निकेतन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर.वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ.एस.एन. पंचभाई, कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.एम. पातोंड, डॉ. एस. इमडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जामगाव (बु.) येथे आगमन झालेल्या कृषिकन्यांमध्ये झील सोमकुंवर, वैष्णवी राऊत, अश्विनी सोनवाणे, प्राजक्ता रायपुरे, धनश्री शेरकी, माणसी ताकवाले यांचा समावेश होता. यावेळी गावातील शेतकरी व ग्रामस्थ भरपूर संख्येने उपस्थित होते.