वरोरा :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याशी संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कृषीदुतांनी साजरे केले आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष.
सदर कार्यक्रम मांगली (देव) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे साजरा करण्यात आला.आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना व गावातील रहिवास्यांना तृणधान्यांचे महत्त्व पटवून देने असे होते. या उपक्रमात कृषीदुतांनी प्रात्यक्षिक रित्या तृणधान्ये विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना दाखवून त्यांच्या बददल माहिती दिली. या कार्यक्रमात कृषीदुतांनी तृणधान्यांमध्ये राजगिरा, ज्वारी , बाजरी, कोडो, नाचणी व राळा इत्यादींचा समावेश केला .
या कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात कृषीसहय्यक् , ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांचा समावेश होता. या कार्यक्रमात कृषीदुतांनी ज्वारी पासून तयार झालेले बिस्किटाचे वाटप केले व विद्यार्थांना त्याचे महत्व पटवून दिले.
सदर उपक्रम आनंदनिकेतन कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी. महाजन कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई, व डॉ. व्ही. व्ही. पाटील यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात आला.
या कार्यक्रमात शुभम कष्टी , तुषार गंधे , प्रीतम पाटील , आदित्य मांढरे , वैभव वैरागडे , प्रतिक धोटे इत्यादींचा समावेश होता.