वरोरा :- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष. सदर कार्यक्रम जामगांव (बु.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे साजरा करण्यात आला.आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना व गावातील रहिवास्यांना तृणधान्यांचे महत्त्व पटवून देने असे होते. या उपक्रमात कृषिकन्यांने प्रात्यक्षिक रित्या तृणधान्ये विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना दाखवून त्यांच्या बददल माहिती दिली. या कार्यक्रमात कृषिकन्यांने तृणधान्यांमध्ये राजगिरा, ज्वारी , बाजरी, कोडो, नाचणी व राळा इत्यादींचा समावेश केला .
या कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमात ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांचा समावेश होता. या कार्यक्रमात कृषिकन्यांने राजगिऱ्यापासुन तयार केलेल्या लाडूचे वाटप विद्यार्थ्यामध्ये केले त्याचप्रमाने त्याचे फायदे समजावून सांगितले.
सदर उपक्रम आनंदनिकेतन कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी. महाजन कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई, व डॉ. व्ही. व्ही. पाटील यांच्या मागदर्शनाखाली राबविण्यात आला.
या कार्यक्रमात प्राजक्ता रायपूरे,मानसी ताकवाले , धनश्री शेरकी, अश्विनी सोनावाने , झील सोमकुंवर, वैष्णवी राऊत या कृषीकन्यांचा समावेश होता.