वरोरा : तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात त्यामुळे त्यांना वरोरा बस स्थानक ते शाळेपर्यंत पायदळ प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना समोर जाव लागत. शिवसेना (उबाठा) वतीने शिवसेनापक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन “मदतीचा सप्ताह” मोहीम जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना छात्रीचे वाटप करण्यात आले.
त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या सहकार्याने,शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांच्या नेतृत्वात प्रत्येक शालेय विद्यार्थीना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी बोडखा येथील शालेय विद्यार्थी यांनी शिवसेना पक्षाचे आभार व्यक्त करुन आनंद व्यक्त केला.गणेश चिडे यांनी काही दिवसापूर्वी शालेय विद्यार्थीसाठी बस सेवा सुरु करुन दिली. सामाजिक उपक्रम राबवून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे शिवसेनेची विचारधारा नेहमी आम्ही कार्यरत ठेऊ असे वक्तव्य शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केले.त्यावेळी युवासेना विभाग प्रमुख सिद्धार्थ सोयाम, शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश तुराळे, समीर तुराळे, हर्षल पेंदोर,तुळशीराम उगे, व्यकन्ट पेंदोर,आशिष थाटे, समस्त गावकरी उपस्थित होते.