वरोरा – मणिपूर राज्यात आदिवासी समाजातील दोन महिलांवर सामूहिकपणे बलात्कार करून त्या महिलांची नग्न करून दिंड काढली त्यांच्या शरीराची निर्दयीपणे छेडछाड केली ही घटना अत्यंत घृणास्पद असून मानव जातीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा संपूर्ण देशात निषेध केला जात आहे.
आदिवासी महिलांवर दडपशाही, अन्याय, अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीची पाठ राखण करणाऱ्या मणिपूर राज्य सरकारला बरखास्त करून प्रशासकीय कार्यात अलगर्जी पना करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून या घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी . पीडित महिलांना संरक्षण देऊन त्यांना आर्थिक मोबदला दयावा या संपूर्ण मागण्यांचे निवेदन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहीद राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शेकडोच्या संख्येने आदिवासी बंधू भगिनी घटनेचा निषेध करत वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात धडकले व देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आदिवासी सगा समाज समितीतर्फे शेकडो आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत वरोरा भद्रावती विधानसभा चे आदिवासी नेते रमेश मेश्राम आदिवासी सगा कृती समितीचे अध्यक्ष सुरेश टोरे, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, सुरेश मडावी ,सामाजिक कार्यकर्ते विलास परचाके ,भास्कर तुमराम ,सुरेश मडावी, गणपत येटे संजय मसराम ,सुखदेव मेश्राम, दिलीप येटे, खेमराज किनाके ,रवी मेश्राम ,प्राध्यापक अविनाश पंधरे ,दादा मडावी, अशोक कुभरे ,मनोज पेंदोर, विजय परचाके, अशोक सुरपाम ,पुष्पाताई मंगाम, वनिता परचाके, अनिता मडावी, वीणा किनाके ,पुष्पा येटे ,जयश्री मेश्राम ,भारती मडावी, दिपाली मेश्राम ,यांच्यासह शेकडो समाज बांधव निवेदन देताना उपस्थित होते.