गडचिरोली:- येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांच्या ठिकाणी जव्हार (पालघर) येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग 26 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास रुजू झाल्या. जिल्हा परिषदेच्या आवारात त्यांचे आगमन होताच जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी फुलांचा वर्षाव करून तसेच महिलांनी औक्षण करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
राज्य शासनाने 21 जुलै रोजी तब्बल 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात कुमार आशीर्वाद यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.त्यांच्या जागेवर जव्हार (पालघर) येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आयुषी सिंग यांचा 26 जुलै ला आगमन होणार म्हणून जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी दुपारपासूनच आतुरतेने वाट बघत होते. अखेर सायंकाळच्या सुमारास त्यांचा आगमन झाला. जिल्हा परिषदेच्या गेटवर त्यांचे वाहन येताच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर महिला अधिकाऱ्यांनी फुलांचा वर्षाव वर्षावात तोंड गोड केले.तसेच औक्षण करून त्यांना त्यांच्या चेंबरपर्यंत नेले.
आयुषी सिंग यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करत माल्यार्पण करून चेंबर मध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.जव्हार (पालघर) येथून निरोप घेताना कर्मचाऱ्यांचा प्रेम पाहून आयुषी सिंग यांना अश्रू अनावर झाले होते.त्याच प्रमाणे गडचिरोलीत आगमन होताच त्यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोषात त्यांचा स्वागत केला.बरेच वर्षानंतर पुन्हा एकदा गडचिरोली जिल्हा परिषदेला महिला आयएएस अधिकारी मिळाले आहे हे विशेष.