गोंडपिपरी :-(सुरज माडुरवार) तालुक्यातील तोहोगाव वासीयांना पावसाळ्यात अतिवृष्टीमध्ये इतर गावाशी संपर्क साधता येत नव्हते.गावात पूरेशी सूविधा नाही.अश्यातच गावकऱ्यांना अनेक संकटाशी झुंज द्यावी लागत होती.पावसाळ्यात हा मार्ग सुरळीत व्हावा म्हणून गावकऱ्यांच्या मागणीनंतर माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी मागील वर्षी नियोजन बैठकीत तोहोगावच्या या समस्येकडे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले.याची दखल घेऊन मंत्री महोदयांनी बांधकाम यंत्रणेला सूचना दिली.त्यानुसार जूलै २०२३ च्या बजेटमध्ये शासनाने पोचमार्गासह पुल बांधकामासाठी १० कोटी रूप्याच्या निधीची मंजूरी दिली.अशावेळी लवकरच तोहोगावातील या पुलाची निर्मिती होणार आहे.
तोहोगाव हे गोंडपिपरी तालुक्यातील मोठे गाव असून हे गाव हे वर्धा नदी आणि कन्हाळगाव अभयारण्यलगत वसले आहे.वर्धा नदीला पूर आला की तोहोगाव पुराच्या पाण्याने वेडला जातो.त्यामुळे या गावाला बेटाचे स्वरूप येते.अशा भयंकर परिस्थितीत गावकऱ्यांना बाहेर पडणे देखिल शक्य नाही.यादरम्यान संपूर्ण गावातील नागरिकांचे जीवनमान विस्कळीत होत असून गावातील पशुधनांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो.त्यासाठी ग्रामस्थांकडून अनेक वर्षापासून पूर परिस्थिती मधून बाहेर पडण्याकरिता नेहमीच मोठ्या उंच फुलाची मागणी होत राहिली.गावकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर बोडलावार यांनी घेतली.त्यांनी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी बोलाविलेल्या आढावा सभेत ही मागणी उचलून धरली.वनमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन सबंधित विभागाला आदेश दिल्यानंतर अधिकारी वर्ग कामी लागला.खुद्द बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता तोहोगावात दाखल झाले.मागील वर्षी याच काळात त्यांनी मोका पाहणी करून लवकरच फुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल,असेही सांगितले.त्यानुसार सद्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात या पुलाच्या कामाला मंजूरी मिळाली आहे.५०५४-५११७ या लेखाशिर्षमधून सदर कामाला गती मिळणार आहे.निधी मिळून काम लवकर सुरू होणार असल्यामुळे परिसरात आनंद आहे.दरम्यान गावकऱ्यांकडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अमर बोडलावार यांचे आभार मानले जात आहे.
—————————————-
दिला शब्द, केला पूर्ण
तोहोगाव वासीयांचा पावसाळ्यात अतिवृष्टीत ईतर गावाशी संपर्क तुटतो.गावात पूरेश्या सोई नाही.यावेळी गावकऱ्यांना संकटाशी झुंज द्यावी लागते.पावसाळ्यातील मार्ग सुरळीत व्हावं म्हणून गावकऱ्यांचा मागणीवरुन अमर बोडलावार यांनी गतवर्षी सूधिर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली.तोहोगावच्या या समस्येची गंभिर दखल मुनगंटिवारांनी घेतली.२३ जूलै २०२३ च्या बजेटमध्ये शासनाकडून १० कोटी रू मंजूर करत शब्द पाळला आहे.