गोंडपिपरी (सुरज माडुरवार) : शेतात कापसाला खत टाकताना महिलेवर वीज पडल्याने जागीच शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची हृद्ययद्रायक घटना गोंडपिपरी तालुक्यात घडली.
तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथील महिला दि.(२५) मंगळवारी शेतात कपाशीच्या झाडांना खत टाकताना सायंकाळी ५ वाजता दरम्यान महिलेवर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.योगिता प्रशांत खोब्रागडे वय (३४) असे मृत महिलेचे नाव असून ठाणेदार जीवन राजगुरू,प्रेमदास चव्हाण,पुलगमकर यांनी शेत गाठून पंचनामा करून प्रेत ताब्यात घेत उत्तरीय तपासनीसाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे आनले.मृतक महिलेच्या पच्यात पती,एक मुलगा,एक मुलगी,सासरे असा बराच मोठा आप्त परिवार असून गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.