हिंगणघाट :- विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे झुंजार नेतृत्व पाहता त्यांचे कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी भाजपात सततचे इनकमिंग सुरू आहे.
काल हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथील भाजप प्रवेशानंतर आज दि.१ एप्रिल रोजी पुन्हा विधानसभा क्षेत्राच्या समुद्रपूर तालुक्यातील भवानपूर येथील महिलांनी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला आहे.
विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे,समुद्रपूर भाजपा तालुका अध्यक्ष संजय डेहणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते विनोद भोयर यांचे नेतृत्वात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भवानपूर तालुका समुद्रपूर येथील असंख्य महिला कार्य कर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. यात महीला कार्यकर्त्या ताराबाई नारायण चौधरी, वनिता शामराव सहारे,प्रभा नारायण सातपुते,वनिता बुरटकर, गयाबाई चौधरी,सुंदर जागो खडसे,चंद्रकला कवडू चौधरी, कलावती शालिक राऊत, सागरता रवींद्र खोंडे, मालन श्रीराम खोंडे, शांता देविदास गौळकर इत्यादिंचा समावेश आहे .