चंद्रपूर :- रामनवमी निमीत्त शहरातील विविध भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. गांधी चौक येथे स्वागत मंच उभारुन या सर्व शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत करत ऑक्टोंबर महिण्यात आयोजित माता महाकाली महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहण केले आहे.
यावेळी माता महाकाली सेवा समीतीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे प्रा. श्याम हेडाऊ, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, ग्रामीण विभागाचे संघटक, मुन्ना जोगी, शिक्षक विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, विलास वनकर, विलास सोमलवार, शहर संघटक करणसिंह बैस, राम जंगम, गौरव जोरगेवार, सायली येरणे, वैशाली मद्दीवार, आशा देशमुख, स्मिता वैद्य, आशु फुलझेले, विमल काटकर, दुर्गा वैरागडे, सविता निखारे, कल्पना शिंदे, निलीम वनकर, अस्मीता दोनाडकर, शांता धांडे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही रामनवमी निमीत्त चंद्रपूरात विविध ठिकाणाहून शोभायात्रा काढण्यात आल्यात. सदर सर्व शोभायात्रा गांधी चौक होत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्त झाल्यात. या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आले होते. यावेळी सदर शोभायात्रेचे स्वागत मंचारुन आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. शोभायात्रेत सहभागी रामभक्तांचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वागत केले. १९ ऑक्टोंबर पासून चंद्रपूरात सुरु होणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहण यावेळी आमदार जोरगेवार यांनी केले.