हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपात सतत इनकमिंग सुरुच असून हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथील सक्रिय कार्यकर्ते टिपू कोचर उर्फ कवी गोल्डी यांचेसह गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज दि.३० रोजी रामनवमीचे पर्वावर भाजपात प्रवेश घेतला.
सदर कार्यक्रमाचेवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, माजी जिल्हा परिषद सभापती माधवराव चंदनखेडे, भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल बाडे, टीपू कोचर उर्फ कवी गोल्डी, भाग्येश देशमुख इत्यादींची उपस्थिती होती.
सदर प्रवेश सोहळा आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात टिपूबाबु कोचर उर्फ कवी गोल्डी यांचे नेतृत्वात अनेक धडाडीच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपाचे धेय्यधोरणावर विश्वास व्यक्त करीत भाजपामध्ये प्रवेश घेतला.
विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांची कार्यप्रणाली व नेतृत्वाने प्रभावित होऊन आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत सर्वश्री शांतीलाल मेघराज कोचर, किशोर वाल्मीकराव वाघ, अनिल मनोहरराव वाघ, संतोष मनोहर वाघ, सदाशिव नारायणराव बोबडे, विलास तिघरे, उमेश उमरे, रोशन सुरकार, रुपेश नासरे, अरुण बुटे, सतीश क्षीरसागर, राजूभाऊ वाघ, अमित वायताडे, राजु ढोबळे,सुनील नासरे ,सतीश वाघ , भैय्याजी वाघ, रामेश्वर दौलतकार, पंडित बुटे, हंसराज उमरे, मयूर वाघ, मधुकर नासरे, अशोक किन्नाके, राजु मनक , प्रमोद वैद्य , गौरव नासरे ,भास्कर बोकडे इत्यादींनी भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश घेतला. उपरोक्त कार्यकर्त्यांचा प्रवेश टिपूबाबु कोचर यांच्या प्रयत्नातून करण्यात आला.