कोरची:- तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरची येथे भाजप सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची वाढत चाललेली लोकप्रियता आणि हिंडनबर्ग संस्थेने उघड केलेल्या अडाणी समूहाच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी सतत आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबण्याकरिता नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सत्तेचा दुरुपयोग करत खासदारकी रद्द करण्याचा षडयंत्र केला. याचा निषेध म्हणून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ व नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधार्थ कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपच्या हुकूमशाही धोरणाविरोधात कोरचीच्या मुख्य चौकात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा महासचिव हकिमुद्दिन शेख, जिल्हा उपाध्यक्ष सदरूद्दिन भामानी, माजी जिप सदस्य रामसुराम काटेंगे, नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, सोशल मीडिया प्रमुख वसीम शेख, चतुर सिंद्राम, रुखमन घाटघुमर, नगरसेवक धनराज मडावी, धरमसाय नैताम, दिलीप मडावी, मेहेरसिंग काटेंगे, कांताराम जमकातन, सरजुराम जमकातन, सरपंच श्यामलाल गावडे, मोहन कुमरे, जगन जमकातन, जीवन नुरुटी, जगदेव बोगा, विठ्ठल शेंडे, लहानु सहारे, दिलीप हलामी, अरुण मोहूर्ले, पंजाबराव उईके, गोपाल मोहूर्ले,खुशाल मोहुर्ले, आसाराम सांडील, हमीद खान पठाण सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.