वरोरा :- वरोरा मतदारसंघातील उभरत आणि कमी कालावधीत लोकप्रिय होते असलेलं युवा, उच्चशिक्षित आणि परिवर्तनशील नेतृत्व म्हणून ओळख होत असलेल्या किशोर टोंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडले.
वरोरा विधानसभा क्षेत्रात नेतृत्वाची पोकळी असल्याने किशोर टोंगे या युवा नेतृतुत्वाकडे अनेकांचे लक्ष लागून असून या जनसंपर्क कार्यालयामुळे किशोर टोंगे यांनी लक्ष वेधून घेतले.
या उदघाटन सोहळ्याची आगळीवेगळी बाब म्हणजे सर्वसामान्य शेतकरी, माजी सैनिक, रिक्षा चालक आणि सफाई कर्मचारी यांना दिलेला मान आहे. हा बहुमान किशोर टोंगे यांनी दिल्याने सर्व उदघाटक मंडळी खुश होती. या वर्गाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने शेती, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाबरोबरच या भागात महिला व तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल यासाठी कामं करणार असल्याच्या भावना किशोर टोंगे यांनी व्यक्त केल्या असून हे कार्यालय जनतेसाठी सैदव उपलब्ध असेल असंही ते म्हणाले.