गोंडपिपरी:-गोंडपिपरी तालुक्यात या आठवड्यात सलग दोन तीन दिवस गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
सतत येणाऱ्या अवकाळी पावसाने हरभरा,गहू,मका,ज्वारी,भाजी पाला पिके उद्ध्वस्त झाली.यंदा शेतमालाला योग्य भाव नाही मागच्या वर्षी अतिवृष्टी मुळे ओला दुष्काळ पडला त्यामुळे आता अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे.तात्काळ नुकसान ग्रस्त शेतपिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी तहसीलदार के डी मेश्राम यांच्या मार्फत जिल्ह्याधिकाऱ्यांना करण्यात आली.यावेळी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार,प्रशांत येल्लेवार,सूरेंद्र घाबर्डे,वैभव बोनगिरवार, सुरेश दूमनवार यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते