भामरागड – तालुका मुख्यालयापासून 4 किमी अंतरावर असलेल्या लाहेरी – भामरागड मुख्य मार्गवरील हिनभट्टी या गावाजवळ आज सायंकाळी 6.30 दरम्यान वाहन क्रमांक -एम. एच.33,ए.5483 पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहन लाहेरी कडून भामरागड ला भरधाव वेगात येत असतांना वाहनावरून चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याचा उजव्या बाजू कडील इलेक्ट्रिक पोल ला धडक दिली आणि पुढे जाऊन झाडाला धडक दिल्याने सदर वाहन पूर्णपणे पलटले. मिळालेल्या माहितीवरून वाहन मालक हा गडचिरोलीचा असून काही कामानिमित्याने लाहेरीला गेला होता. या वाहनात फक्त दोघे बसून होते मात्र कोणालाही कोणत्याही प्रकारच्या गंभीर दुखापत झाली नाही.