:- वीज वितरण कंपनीने भद्रावती तालुक्यातील कुनाडा गावाची वीज खंडित केल्याने ग्रामस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांना निवेदन दिले. प्रकरण गंभीर असल्याने विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांचा मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकारी व कुनाडा ग्रामस्थसह पत्रकार परिषद घेण्यात आली तसेच तहसीलदार भद्रावती यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर डुकरे, विश्वास कोंगरे, रवींद्र आवारी, सुरेश उमाटे, सुरेश बावणे, डॉ. नरेंद्र दाते, सईबाई कश्यप, ज्योती कोमटी, शोभा बावणे, वंदना शिरपूरकर, वंदना बावणे, रत्ना आत्राम, वंदना भडके व बहुसंख्या कुनाडा ग्रामवासी उपस्थित होते.