गोंडपिपरी –महिला आज कुठेच कमी नाहीत.राजकारणात येण्याच्या निर्णयानंतर कुटूंबियांसह जनतेनी मला भरभरुन सहकार्य केले.सर्वांच्या आशिर्वादानेच आजतागायत विविध पदे भूषवता आली.मात्र नेते होऊन मिरवण्यापेक्षा सदैव कार्यकर्ताच राहूण आपल्या सेवेत राहण्याला मी माझे भाग्य समजते.कोणत्याही पदावर नसतांना आज गोंडपिपरीकरांनी साजरा केलेला वाढदिवस म्हणजे माझ्या सत्कार्याची पावती आहे.हा सोहळा माझ्यासाठी अविस्मरणीय राहिल,असे मत ८१ व्या वाढदिवस सोहळ्याला उत्तर देतांना माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले.गोंडपिपरीतील लाडूतुल्यानंतर त्या बोलत होत्या.
गोंडपिपरी तालुक्याविषयी मला विषेश प्रेम आहे.जेव्हा कधी ईथे माजी गरज भासली तेव्हा -तेव्हा मी येथे आली आहे.प्रसंगी आंदोलने उभारणी आहेत.या समोरही गोंडपिपरीकरांच्या सेवेसाठी मी सदैव तयार असल्याचे मत माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले.तालुक्याच्या विकासासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे देखिल त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष संदीप करपे,भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे,अविनाश जगताप,तन्मय फडणवीस,अनिल संतोषवार,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,नगरसेवक महेंदसिंह चंदेल,माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार,प्रतिष्टीत व्यापारी सुहास मांडूरवार,दिपक बोनगीरवार,नगर पंचायतीचे सभापती सुनिल संकुलवार,सरपंच पोचमल्लू उलेंदला,शिवसेना शहर प्रमुख रियाज कुरेशी,नगरसेविका मडावी,अरुणा जांभुळकर,कोमल फरकडे,स्वप्नील अनमूलवार,तुकेश वानोडे,अरुण वासलवार,साईनाथ मास्टे,निलेश पुलगमकर,दिपक वांढरे,नरेंद्र इंगोले,बब्बू पठाण,आनंदराव गोहणे,नगरसेवक चेतनसिंह गौर,शैलेशसिंह बैस,नगरसेवक अश्विनी तोंडासे,गणपती चौधरी,नगसेविका मनिषा दुर्योधन,भूमी पिपरे,माजी जि.प.सदस्य स्वाती वडपल्लीवार,अस्मिता रापलवार,बळवंत भोयर,विवेक राणा उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन निकोडे,संचालन सचिन फुलझले तर आभार निलेश पुलगमकर यांनी मानले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप करपे मुख्य आयोजक असलेल्या या सोहळ्यात तालुक्यातील विविध पक्षाचे नेते,सामाजिक संघटना,व्यापारी संघटना,पत्रकार संघ,महिला मंडळ,बचत गटाच्या महिला आणि तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती.
—————————————-
संदिप करपे माझा मानसपुत्र :-
भाषणादरम्यान संदिप करपे हा माझा माणसपुत्र असल्याच्या भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.त्याच्या हाकेला मी सदैव धावून येत राहिल.आणि गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.