वर्धा :- संघर्ष एग्रो प्रॉडक्स अँड मल्टीसर्विसेस वर्धा च्या वतीने शेतकऱ्यांनी परंपरागत शेती करण्यासोबतच नवनवीन पिक घेण्याच्या उद्देशाने बाजारपेठेत प्रचंड मागणी असणाऱ्या जेरेनियम गवती वनस्पतिची शेती करुण उत्पादनात वाढ करावी असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना संघर्ष एग्रो चे संचालक राहुल मून व प्रशांत अवचट यांनी वायफड येथे आयोजित जेरेनियम गवती वनस्पतिच्या कार्यशाळेत केली.
जेरेनियम गवती वनस्पतिचा उपयोग सुगंधित द्रव्य, सौंदर्य प्रसाधने आणि वातनाशक औषधि करीता होत असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत याला प्रचंड मागणी आहे. जेरेनियम गवती वनस्पतिची १३ महिन्यात चारदा कटाई होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील शेतकरी अद्भुदय मेघे यांच्या शेतात यशस्वी झालेल्या प्लांट ला शेतकऱ्यांची भेट देण्यात आली आणि कार्यशाळेत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला संघर्ष एग्रो च्या सल्लागार समितीचे सदस्य अतुल शेंडे, डॉ. कपिल मून, गजानन बोरजे, प्रकाश भित्रे, शेखर घागरे, गजानन अनंतवार, राजेश जयस्वाल, अमित ठवरे यांची प्रमुख उपस्थिति होती. यावेळी कार्यशाळेत वर्धा जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र लांबट, रत्नाकर कावळे, श्रीरामजी डेहनकर, सचिन सावरकर, योगेश दिग्रसे, बालिश कुमारे, अमोल कजगाळे, अभिलाष ढांगे, अमोल देशपांडे, प्रशांत ढांगे, विजय शिरभाते, रितेश लोहोट, यश नानोटी पंकज गावंडे इत्यादि शेतकरी सामील झाले होते.