अहमदनगर (अण्णासाहेब चौधरी )संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव बुधवारी (ता.9) सकाळी भूकंपसदृश्य धक्क्यांनी हादरले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी सकाळी जोराचा आवाज झाल्याने घारगाव येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आवाजाची तीव्रता मोठी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख, सतीश धात्रक, आमीर शेख आदी नागरिकांनी सांगितले. तर काही वर्षांपासून बोटा, माळवाडी, केळेवाडी, कुरकुटवाडी या गावांसह आदी गावांना भूकंपाचे धक्के बसले असून त्या धक्क्यांच्या नोंदीही नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर झाल्या आहेत.
नाशिक येथील मेरी संस्थेच्या वरीष्ठ भू- वैज्ञानिक चारूलता चौधरी यांच्यासह वरीष्ठ अधिकार्यांनी याठिकाणची अनेकदा पाहणी केलेली आहे.
घारगाव भूकंपसदृश्य धक्का बसला असुन
नागरिकांनी घाबरुन जावू नये असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.