वरोरा : नफरत छोडो भारत जोडो. हात से हात जोडो या नाऱ्यासह वरोरा काँग्रेस कमिटीतर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात नागरिकांना पत्रक वाटून हात जोडत हे अभियान राबविण्यात आले . ३५०० किमी ऐतिहासिक भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी पूर्ण केल्याने कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत या पदयात्रेत कोट्यावादि भारतीयांनी सहभाग घेतला. कॉग्रेसच्या हाताला हात जोडून एका अशा सुवर्ण भारताच्या उभारणीत आमची साथ दयावी. त्यानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात हात से हाथ जोडो अभियान राबविण्यात येत आहे.असे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले .
वरोरा येथे या अभियानाची सुरुवात नवीन नगर परिषद समोर सदभावना चौक येथून करण्यात आली त्यानंतर मुख्य रस्त्याने पत्रके वाटप करण्यात आली. आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नंतर मुख्य बाजारपेठेतील गांधी चौक, डोंगरवार चौक , मित्र चौक ,कामगार चौक व नेहरू चौक येथील व्यापाऱ्यांना हाथ जोडून पत्रके वाटून तसेच त्यांच्याशी संवाद साधून अभियानाची सांगता करण्यात आली. या अभियानात आमदार प्रतिभा धानोरकर, तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर , शहर अध्यक्ष विलास टिपले. प्रमोद मगरे, राजू चिकटे , विशाल बदखल, माजी नगर सेवक गजानन मेश्राम , सान्नि गुप्ता ,प्रमोद काळे ,मनोहर स्वामी , राजू बनसोड , प्रफुल असूतकर , निलेश भालेराव माजी नगर सेवक चंद्रकला चिमुरकर ,चेतना शेट्टे, यशोदा खामणकर व आदी कार्यकर्ते उपस्तिथ होते.