अहेरी: ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे रस्ते. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहोचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.नुकतेच त्यांच्याहस्ते आरेंदा ते ताडगुडा रस्त्याचे भूमपूजन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला असून विविध रस्त्यांची कामे मार्गी लागत आहे.ग्रामीण भागातील महत्वाचा घटक कास्तकार म्हणजे शेतकरी,शेतमजूर हे रस्त्यामुळे आपले भविष्य घडवू शकतात.आर्थिक बळकटी त्यांना रस्त्यांच्या माध्यमातून मिळू सकते.त्यामुळे खेड्यांना शहराशी जोडणारे रस्ते होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एवढेच नव्हेतर आपल्या देशात ब्रिटिशांची सत्ता असताना त्यांनी तयार केलेल्या पुलांची,रस्त्यांची कामे त्यांच्या सचोटी आणि गुणवत्तेची साक्ष देतात. त्यांनी तयार केलेले पुल शंभर,सव्वाशे वर्षे तग धरून आहेत.पण अलीकडच्या काळात तयार केलेले पुल,रस्ते किंव्हा इमारतीची कामे निकृष्ठपणाचा कळस आहेत.कुठलेही बांधकाम अधिक काळ टिकण्यासाठी दर्जेदार काम करा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्त्याचे काम
या रस्त्याच्या कामासाठी तब्बल 313.00 लाखांची निधी मंजूर असून राष्ट्रीय महामार्ग 382 ते आरेंदा- ताडगुडा पर्यंत काम होणार आहे.ग्रामीण भागातील अनेक गावे राष्ट्रीय महामार्गाची जुळणार असल्याने या भागातील आदिवासींची अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.