भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आज एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यावेळी वाणिज्य शाखेतील डॉ. विजय टोंगे, डॉ. बंडू जांभुळकर, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ.रमेश पारेलवार, डॉ. गजानन खामनकर, डाॅ यशवंत घुमे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. उमाटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना “महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागाची आवश्यकता काय? या विषयावर विवेचन केले. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आपण आपले व्यक्तिमत्व उत्तमरीत्या साकारू शकतो असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.” या कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. अमोल ठाकरे, आभारप्रदर्शन डॉ. गजानन खामनकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होती.