भद्रावती : केवळ शिवजयंती साजरी करुन होणार नाही किंवा शिवाजी महाराजांचे नाव घेवून होणार नाही तर जनतेनी शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणावे, असे प्रतिपादन रवींद्र शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य तालुक्यातील नंदोरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान, नंदोरी (बु.) द्वारा “शिवजन्मोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि.१९) ला करण्यात आले होते.
यानिमित्त माजी सैनिक सत्कार सोहळा तसेच मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र शिंदे, अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, तर प्रमुख पाहुणे किशोर टोंगे, शरद खामनकर, मंगेश भोयर, भानुदास ढवस, किशोर उमरे, अजित पुसनाके, जयश्री एकरे, कविता हंसकार, उषाताई लांबट, संगीता एकरे, शारदा जीवतोडे आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांचा देशाप्रती त्याग व योगदानाचा गौरव म्हणून परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सोबतच मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
मोठ्या संख्येने युवक तथा गावकऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान, नंदोरी (बु.) च्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.