तरुणांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा: किशोर टोंगे यांचे प्रतिपादन
वरोरा : शिवजयंती च्या निमित्ताने मित्रसेवा ग्रुप ऑफ फाउंडेशन, वरोरा यांच्या वतीने हनुमान वार्ड, वरोरा येथे शिवजयंती सोहळा व मिरवणुक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून युवा नेते इंजी. किशोर टोंगे सहभागी झाले होते यावेळी ते बोलत होते.
शिवजयंती हा प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या घराघरात साजरा करावयाचा सण आहे. आज आयोजित सोहळ्यात शहरातील सर्व शिवभक्त मावळे उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे याचा मला मनापासून आनंद आहे असं ते म्हणाले.
सर्वसामान्य रयतेच कल्याण हेचं शिवाजी महाराजांच्या राजकारभाराचं ब्रीद राहील असून सर्वांना समान न्याय हे तत्व आपल्यासाठी आदर्श आहे. महाराजांच्या राज्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता तर प्रत्येक घटकाचा योग्य तो सन्मान केल्या जात होता त्यामुळे ते प्रत्येकाला आपलं स्वराज्य वाटायचं असंही ते म्हणाले.
आज आपल्या पिढीला महाराजांनी हे दिलेले विचार पुढे घेऊन जायचे आहेत. आज देशात महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर असण्याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि त्यांनी दिलेला या भूमिला विचार आहे त्यामुळे हा विचार आणखी प्रखरतेने आपल्या डोक्यात घेऊन प्रत्येकाने काम करणे गरजचे आहे त्यातूनच आपलं गावं, आपला समाज आणि आपला देश पुढे जाईल.
याचं प्रेरणेने आणि विचाराने आपण प्रत्येकाने सर्वांनी मिळून शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे काम करणे गरजचे आहे. तरच आपला आणि समाजाचा विकास शक्य आहे.
यावेळी या सोहळ्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या मित्रसेवा ग्रुपचे पदाधिकारी . शरद पुरी, वैभव डहाणे आणि त्यांची सर्व टीम यांचे त्यांनी कौतुक केले.