भद्रावती :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जाणता राज्याला मानवंदना देत पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशान्वये शिवसपंर्क अभियान अंतर्गत वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत भद्रावती तालुक्याती कचराळा या गावात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकर) शाखा उदघाटन सोहळा पार पाडला.
यावेळी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी शाखेचे रितसर उद्घाटन करून शाखेच्या फलकाचे अनावरण केले. या प्रसंगी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी कचराळा शाखेच्या पदाधिकारी यांच्या नियुक्या केल्या. कचराळा येथील कार्यकर्ते पंकज उरकुडे, कपील झाडे, भैय्याजी येरगुडे, महादेव सोमलकर, गणेश नरूले, आशिष गुड्डलवार, निखील रामटेके, प्रविण थेरे, निलेश येरगुडे, किसन येरगुडे, जगन्नाथ पायताडे, गजानन धोडे, शंकर चुदरी, मोरेश्वर ठुनेकर तसेच उप-जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे तसेच बहुसंख्य गावकरी उपस्थीत होते.