गोंडपिपरी(सुरज माडुरवार):- कोण किती ध्येयवेडे असते त्याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही त्यात पैसे कमवण्यासाठी अनेक जण ध्येया झपाटून स्वतःला झोकून देतात.. पण समाजासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे झोकुन देणारे दुर्मिळ.त्यात युवतीचा पण अशीच एक ध्येयवेडी सध्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात प्रवास करत आहे ती घराबाहेर पडली आहे त्याला सहा महिने झाले.आश्चर्य म्हणजे ९१६५ किलोमीटरचा प्रवास चक्क तिने सायकलवरून केला आहे.केवळ महिला ,युवती मध्ये जनजागृती व महिला सशक्तीकरणासाठी
ती ध्येयवेडी युवती म्हणजे मध्यप्रदेश राज्यातील आशा मालविया नटाराम गावची ता.खिलचीपूर,जी राजगड येथील २४ वर्षीय आशा गोवा,कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,आंद्रप्रदेश,तेलंगणा व आता महाराष्ट्रात सायकलने भ्रमंती करीत महिला सशक्तीकरणासाठी संदेश देत आहे.
‘सायकल यात्री’ म्हणून सध्या तिची ओळख झाली आहे.पदवीधर शिक्षण घेतलेली उच्चशिक्षित तरुणी घरची परस्थिती हलाकीची वडिलांचे निधन कुटुंबात फक्त आई व बणीसोबत शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा दैनंदिन क्रम .पण सध्या देशात महिलांवर होत असलेले अत्याचार महिलांवर होणार अन्याय युवतींपुढे असणाऱ्या समस्यां अनेक प्रश्न तिला भेडसावत होते त्यामुडे सायकलने प्रवास करून आदिवासी,ग्रामीण,शहरी भागात जाणे स्थानिक संस्था,शाळा,सरकारी यंत्रणेतील अधिकारी ,सामाजिक कार्यकर्त्यांना भेटणे व जनजागृती उद्देश ठेऊन सवांद साधने परिस्थिती समजून घेणे मानसिकतेचा अभ्यास करणे आदी बाबींसाठी तिने प्रवास सुरु ठेवला असून एकंदरीत २८ राज्यात प्रवास करून १५ आगस्टला दिल्लीत प्रवासाची सांगता करणार असल्याची माहिती गोंडपिपरीत सामाजिक कार्यकर्त्यांशी सवांद साधताना दिली.
आशा सांगते की मी कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील असून हा प्रवास माझा व्यक्तिगत आहे.कुठल्याही शासकीय किव्हा संस्थेच्या वतीने निघाली नाही.कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशीप नाही.माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून लोकांकडे खाणे,राहणे असते सोबत लोकच आर्थिक मदत करतात महिला सन्मानाच्या बाता सर्वच करतात मात्र उपदेश हा देण्या घेण्यापुरतेच राहिले आहे अशावेळी कुणावर अवलंबून न राहता सवय स्फूर्तीने महिला जागृतिचा लढा उभारला नव्हे तर अनेकांना ती आपल्याशी जुळवू पाहत आहे घराबाहेर पडा बोलते व्हा स्वयंरोजगार निर्माण करा.हिम्मत करा हिमतीपुढे कुठलीच समस्या टिकणार नाही मी एकटी सुरक्षित प्रवास करत आहो आपण स्वतःला असुरक्षित समजू नये हा संदेश देत आहे नक्कीच तिचा हा प्रवास प्रेरणदायी आहे.यावेळी तिचे गोंडपिपरीत ठाणेदार जीवन राजगुरू यांनी तिचे स्वागत करत सवांद साधला गोंडपिपरी शहरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.