चेकबापूरवासी त्रस्त
गोंडपिपरी :- राज्यात शिवजयंती साजरी करण्याची लगबग सुरू आहे.कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर परवानगी घेणे आवश्यक असते. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर ग्रामपंचायत अंतर्गत येतं असलेल्या चेकबापूर येथील जयभवानी नवयुवक मंडळांनी शिवजयंती साजरी करण्याचे ठरविले. मात्र येथील महिला पोलिस पाटील भाग्यश्री मुत्येमवार यांनी परवानगी नाकारली आहे.याबाबत संतप्त झालेल्या युवकांनी पोलीस स्टेशन लाठी येथे तक्रार दाखल केली आहे.
सकमुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेकबापूर येथील महिला पोलिस पाटलाचा प्रश्न तालुक्यात चांगलाच चर्चेत आहे. गाव विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या या महिला पोलिस पाटलाला पाय उतार करण्याची मागणी येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. असे असताना देखील शिव जयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागायला गेलेल्या जयभवानी नवयुवक मंडळातील युवकांना परवानगी नाकारली आहे. यातून देखील या महिला पोलिस पाटलाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा वादग्रस्त दिसून येत आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या पोलीस पाटलांची असताना जवळील व्यक्तींना परवानगी देणे आणि विरोध म्हणून दुसऱ्या गटाला परवानगी नाकारून वाद उपस्थीत करण्याचे काम स्वतःमहिला पोलीस पाटलाकडून सुरू आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन लाठी येथे तक्रार दाखल केली आहे. यावर काय कार्यवाही करतात याकडे चेकबापूर वासियांचे लक्ष लागलं आहे.
— सदर महिला पोलिस पाटलाचा मनमानी कारभार बघता गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यामुळे या महिला पोलिस पाटील यांना पदमुक्त करुन नविन नियुक्ती करण्यात यावी.
— संतोष मुगलवार,
ग्रामपंचायत सदस्य, सकमूर