आलापल्ली:- सध्याचा काळामध्ये स्पर्धेत अनन्यसाधारण महत्व असून स्पर्धेतूनच ग्रामीण खेळाडूंना चांगला वाव मिळतो व जिल्हा,राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण खेळाडू आपल्या खेळाचा प्रदर्शन करून राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. कुठल्याही स्पर्धेत जिंकण्याचा जिद्द राखून आपल्या खेळाचा प्रामाणिक पणे प्रदर्शन केल्यास यश निश्चितच मिळेल असे मत माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केले. नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येन्कापल्ली येथे इलेव्हन क्रिकेट क्लब द्वारा आयोजित रात्रकालीन भव्य खुले टेनिस बॉल 30 यार्ड क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाईन हकीम,आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार,नागेपल्ली चे ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार,येन्कापल्ली येथील पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर गावात प्रवेश करताच गावकऱ्यांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या महामानवांचा प्रतिमांना माल्यार्पण करून मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सरपंच शंकर मेश्राम आणि सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच एका छोट्याश्या गावात रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे खूप छान आयोजन केल्याने आयोजकांचे मान्यवरांनी प्रशंसा केली.
स्पर्धेचे उदघाटन होताच मान्यवरांनी क्रिकेटचा आनंद घेत स्पिचवर जोरदार फटकेबाजी केली.