कारंजा (घा) – कारंजा तालुका तांत्रिक स्वयंरोजगार व बेरोजगार सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीची सभा ९ फेब्रुवारी रोज गुरुवारला दुपारी ठिक १२ वाजता अध्यासी अधिकारी श्री.वी.केळकर यांचे अध्यक्षतेखाली संस्थेचे कार्यालय कारंजा येथे पार पडली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पदी ललित वंजारी यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी धिरज कसारे उपाध्यक्ष पदी राजेश काळे यांची निवड करण्यात आली.तसेच अंकुश नासरे , आनंद झाडे , वैभव खवशी, पवन कापटे ,प्रकाश पोळ, देवानंद टोंबरे, प्रभाकर बरबट, कविता काळे सर्व नवनिर्वाचित सदस्याची निवड करण्यात आली.