गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- म्हणतात न लग्नगाठी या देवाघरी बांधल्या जातात तसाच प्रत्यय नुकताच गोंडपिपरी येथे आला. दि.(५) सोमवारी सायंणकाडी ७ च्या दरम्यान गोंडपिपरी येथे मूकबधिर सुनीता व मूकबधिर रामदासचा अनोखा विवाह मासुम धनवंती दर्ग्यात पार पडला.
सुनीता लिंगा मोहूर्ले वय (४२) राहणार नागेपल्ली पो.आलापल्ली तालुका अहेरी जी गडचिरोली येथील मूकबधिर महिला व चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील मूकबधिर रामदास प्रल्हाद धोडरे वय (३८) यांची मैत्री जुळली मूकबधिर प्रल्हाद हा नेहमी मजुरी निमित्य नागेपल्ली परिसरात जायचा अशातच दोघांचे प्रेमाचे सूत जुळले व सुनीता घरून पळून गोंडपिपरी येथील मैत्रिणीकडे आली सुनिताचा घरच्यांनी शोध घेतला असता आढळून न आल्याने हरवल्याची तक्रार अहेरी पोलिसात दाखल केली त्यांनतर अहेरी पोलिसांना मुलगी गोंडपिपरीत मूकबधिर मुलाकडे असल्याची माहिती मिळाली त्यानंतर सर्व माहिती गोंडपिपरी ठाणेदार जीवन राजगुरू यांना देण्यात आली राजगुरूंनी तपासाची चक्रे फिरवत शहरातील सर्व मुकबधिरांचा शोध घेत ठाण्यात बोलावले तपासातून मुलगी गोंडपिपरी येथील मैत्रिणीकडे असल्याची माहिती मिळाली त्यांनंतर मुलाला व मुलीला पोलीस स्टेशन ला बोलावून त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात त्यांनंतर मुलगी स्व गावी जाणार नसल्याची भूमिका घेतली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुरेश चरडे,कोतवाल संघटनेचे पदाधिकारी गजानन बटे,सदाशिव बोरकुटे ,सुभाष नेवारे,अक्षय नरशेटीवार यांनी सर्व विवाह नोंदणीची प्रक्रिया पार पाडत दर्ग्यात संस्थेतर्फे रितिरिवाजाने लग्न लावून देत सामाजिक दायित्व जोपासले मुलाला वडील नसून आई मूकबधिर आहे.मुलीला देखील वडील नसुन आई व एक मोठा भाऊ आहे या लग्नसोहळ्याला अनेक मुकबधिरांची उपस्थिती होती सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा तालुक्यात आहे