लातूर-जिल्ह्यातील पोलीस ठाणे, देवणी येथे बेवारस असलेल्या एकूण 50 मोटार सायकलींचा लिलाव गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्याचे आयोजन केले आहे. तरी ईच्छुकांनी पोलीस ठाणे, देवणी येथे 200/- रुपयेच्या बाँडसह उपस्थित रहावे, असे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे, देवणी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पोलीस ठाणे, देवणी येथे बेवारस असलेल्या मोटारसायकलचा लिलाव करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व तालुका दंडाधिकारी देवणी यांच्याकडून परवानगी घेण्यात आलेली आहे असे ही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.