गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील शेतकरी पीक संरक्षणासाठी लाकडी खुठे तुरीच्या सभोवताल ठोकली होती आज तुरी मळई करण्यासाठी तार व खुटे काढण्यासाठी शेतकरी गेला असता अचानक पाय घसरून खुठ्यासकट बाजूला असणाऱ्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि(२२ रविवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.
मृतक शेतकऱ्याचे नाव सोमनाथ शुकनाथ ईस्टाम रा.चेकपिपरी असे आहे.
घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पीएसआय मोगरे,पोलिस कर्मचारी वंदिराम पाल,जाधव,शांताराम पाल घटनास्थळी दाखल होऊन म्रुतकाचे शव विहिरीबाहेर काढून उत्तरर्णीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे आणण्यात आले.पुढील तपास ठानेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात गोंडपीपरी पोलीस करीत आहे.मृतक सोमनाथ हा अल्पभूदारक शेतकरी असून त्याच्या पच्यात पत्नी व तीन मुली असून घरची परिस्थिती हलाकीची असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच रवींद्र खेरकर यांनी केली आहे