विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातील आधारवड आदरणीय श्री मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब ह्यांचे आज (दि.२२) ला सकाळी हार्ट अटॅक मुळे निधन झाले. साहेबांना सर्व स्तरातून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी टेमुर्डे साहेबांची निधन वार्ता शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांना कळविली. त्यानंतर लगेच शिवसेना प्रमुख मा. श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांनी दिवंगत मोरेश्वरराव टेमुर्डे साहेबांना अभिवादन करुन श्रध्दांजलीचा संदेश पाठविला. राजकारणातील सज्जन व स्पष्टवक्ता हरपला असल्याच्या शोकसंवेदना पाठविल्या.
दिवंगत मोरेश्वरराव टेमुर्डे साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो…!