हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य
वरोरा : स्त्रियांची आर्थिक क्षमता व योगदान हे खऱ्या अर्थाने कळले ते देशात नोटबंदी लागू झाली त्यावेळी. नोटबंदीच्या वेळेस महिलांच्या पिगी बँक व बटव्यातून जो संचित निधी बाहेर आला, त्यातून त्यावेळी कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पूर्तता झाली. किंबहुना, महिलांची आर्थिक दूरदृष्टी कुटुंबाच्या लक्षात आली. त्यामुळे महिलांच्या हाती जर कुटुंबाची व व्यवसायाची आर्थिक नाळी दिल्यास स्त्री अर्थक्रांती करु शकते, असे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेना प्रमुख रवींद्र शिंदे म्हणाले.
निमित्त होते वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील वसंत भवनात आयोजित हळदी कुंकुम व स्नेहमिलन सोहळ्याचे. हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा महिला आघाडीतर्फे दिनांक १६ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत हळदी कुंकूम व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन सुरू आहे. आज (दि.२१) ला सोहळ्याचा ५ वा दिवस शेगाव येथील वसंत भवन येथे पार पडला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख चंद्रपूर नर्मदा बोरेकर , कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेना विधानसभा प्रमुख वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्र रवींद्र शिंदे ,प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर , चंद्रशेखर कापटे, देवेंद्र बोधाने , वायगाव येथील सरपंच विजय नन्नावरे , चिंतामणी मांडवकर , पवन महाडिक, गोपाळ राजपूत , पार्डी येथील सरपंच वंदना जुनघरे , सोनेगाव येथील सरपंच तेजस्विनी बुराण, बोरगाव येथील सरपंच वामलक्ष्मी गोवऱदीपे, महिला तालुका प्रमुख सरला मालोरकर, माला ठेंगणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते .
पुढे बोलतांना रवींद्र शिंदे म्हणाले की शिवसेना प्रत्येक महिलेच्या पाठीशी भावासारखी उभी राहील. या क्षेत्रातील कोणत्याही महिलेवरिल अत्याचार खपवून घेतल्या जाणार नाही. स्त्रियांनी शिवसेनेच्या वाघीनी बनावे व स्वतःचा, कुटुंबाचा तथा गावाचा विकास घडवून आणावा. या कार्यात आम्ही सदैव स्त्रियांच्या पाठीशी आहोत.
रवींद्र शिंदे यांच्या भाषणापूर्वी तालुका प्रमुख दत्ता बोरकर यांनी आपल्या भाषणातून विधानसभा क्षेत्रातील सत्य परिस्थिती कथन करीत . आपल्या हातून २०१४ ला खूप मोठी चूक झाली ती चूक आता रवी शिंदे यांच्या पाठीशी उभी राहून सुधारायचे आहे असे मत व्यक्त केले .तसेच नर्मदा बोरेकर यांनी शेगाव परिसरातील महिलांशी असलेलं ऋणानुंबंध व जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक असे भाषण केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाडोळी येथील सरपंच प्रतिभा मांडवकर यांनी तर प्रास्ताविक सरला मालोकार यांनी केले. यावेळी परिसरातील स्त्रियांची भरगच्च अशी उपस्थिती होती