वरोरा : सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांची १ जानेवारी रोजी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती होताच जुन्या व नव्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले असून . रवी शिंदे यांचे सामाजिक कार्याची महती ऐकूनविविध पक्षांतील कार्यकर्ते , युवक , महिलांचे शिवसेनेत इनकमिंग सुरु झाले आहे .
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून दि.२१ जानेवारीला शेगांव( बुज.) येथील वसंत भवन येथे घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला .यावेळी शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या .
रवींद्र शिंदे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारसरणीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर , वरोरा -भद्रावती निर्वाचन क्षेत्र शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, वरोरा शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर हे उपस्थित होते . विवेक जांभुळकर , मधुकर शेळकी, सतीश कुंभारे , प्रमोद कुंभारे , शंकर खाडे, विलास कष्टी , गजानन कुंभारे , राहुल जुंबळे, गजानन शेंडे , अजय दडमल , मनीष श्रीरामे , फारुख शेख , अमोल कापटे, ओम कापटे , अरमान पठाण , प्रणय कोसूरकर , भूषण सोनुने , मेहर सहारे , भोला पोटदुखे , अक्षय दातारकर , भूपेश वैरागडे , प्रतीक आस्कर, वैभव कोसूरकर, शिला बंडू पोकडे , वंदना केशव साखरकर , कल्पना आनंदराव साखरकर , भावना लक्ष्मण घोडमारे , प्रीती अरविंद लांजेकर , जोत्स्ना शंकर फुलकर , मंजुळा साखरकर , कल्पना आनंदराव साखरकर यांच्या सह अनेक युवक व महिलांनी पक्ष प्रवेश केला .
रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी तर्फे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रांतील विविध गावात भव्य हळदी कुंकू व महिला स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन सुरु आहे . या कार्यक्रमाला असंख्य महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरत असून रवींद्र शिंदे यांची नियुक्ती होताच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा झंझावात बघायला मिळत आहे .