भद्रावती : स्थानिक फेअरीलँड हायस्कूल येथे दिनांक १८ ते २० जानेवारी या कालावधीत शिक्षण विभाग भद्रावतीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये विवेकानंद माध्यमिक विद्यालय, भद्रावती येथील श्रवण गजानन आस्वले या विद्यार्थ्याने इयत्ता ६ ते ८ या पूर्व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याच्या प्रतिकृतीची जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली. त्याने सदर विज्ञान प्रदर्शनीत सादर केलेली मॅजिक टेस्टर ही प्रतिकृती व प्रतिकृतीच्या समर्थनार्थ प्रस्तुत केले. सादरीकरण समस्त अभ्यागत व प्रशिक्षकांना प्रभावित करणारे होते. त्यासाठी त्याला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सदर प्रतिकृती तयार करण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक दयाकर मग्गीडवार ह्यांचे मार्गदर्शन लाभले.या सुयशासाठी संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे , सहसचिव राजू गावंडे, मुख्याध्यापक अनिल ढवस तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.