वरोरा :- लोक शिक्षण संस्था वरोडा द्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालय वरोराच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 09 डिसेंबर 2022 रोज शुक्रवार ला सकाळी 10:00 वाजता करण्यात येणार आहे. लोकमान्य महाविद्यालयाच्या वाटचालीला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून उपक्रमशीलता हाच स्थायीभाव बाळगण्याचे काम महाविद्यालयाने केले आहे.
महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी उदघाटन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रा. श्रीकांत पाटील (अध्यक्ष, लोक शिक्षण संस्था, वरोडा ) तसेच उदघाटक म्हणून डॉ. श्रीराम कावळे (प्र-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली )हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी डॉ. विकास आमटे (सचिव, महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा )यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. जी. देवगावकर, डॉ. बी. व्ही. मोहरील व श्रीकृष्ण घड्याळपाटील (उपाध्यक्ष, लोक शिक्षण संस्था, वरोडा ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिन्ह हे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष राहतील. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक,संस्थेचे हितचिंतक आणि पंच क्रोशीतील नागरिकांनी मोठया संख्येनी उपस्थित राहावे असे आव्हान प्राचार्य डॉ. एस. के. सिन्ह यांनी केले आहे.