स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट व ग्रामीण रूग्णालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमात आयोजन
भद्रावती :दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशासकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात.
१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधी मधे “मातेकडून होणाऱ्या बाळाला एच आय व्ही / एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे”, या बाबतचा संदेश घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहचविण्याचे कार्य सुरू आहे.
याच अनुषंगाने भद्रावती तालुक्यात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा विदेही सदगुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रूग्णालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने “एच.आय.व्ही/एड्स बद्दल माहीती व जाग्रृती” कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र, चालबर्डी येथे आज (दि.७) ला “एच.आय.व्ही/एड्स बद्दल माहीती व जाग्रृती” कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थीती स्वरुपात ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष धनराज आस्वले, भद्रावती ग्रामिण रूग्णालयाचे RCTC समोपदेशक शितल भडके, DRP कार्यकर्ता रोशन आकुलवार, प्रा.आ. केन्द्र चालबर्डीचे डाॅ. मनोज मेश्राम, डाॅ. महेश येवूल, डाॅ. दिपाली खिरटकर, सरपंच प्रियंका सोयाम, ग्रामसेवक जयश्री चंदनखेडे आदी उपस्थित होते.
सरपंच प्रियंका सोयाम यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष धनराज आस्वले यांनी एड्स बद्दल माहीती दिली.
भद्रावतीच्या जीजामाता नर्सिग काॅलेजच्या २२ मुलीच्या टिमने एड्सवरती जनजाग्रृतीपर पथनाट्य सादर केले. व नंतर गावात फेरी काढण्यात आली.
याच पध्दतीने भद्रावती तालुक्यातील पीरली येथे ८ डिसेंबर, काटवल तुकुम येथे ९ डिसेंबर, मनगाव थोराना येथे १० डिसेंबर, वायगाव येथे ११ डिसेंबर, हनुमान नगर येथे १२ डिसेंबरला जनजाग्रृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सर्व जनजागृती अभियानाला ट्रस्टचे अध्यक्ष रविन्द्र शिंदे संपूर्ण सहकार्य करीत आहेत.