गडचिरोली:-मुलचेरा तालुका मुख्यालयात नाकाबंदी दरम्यान मुलचेरा पोलिसांनी पुन्हा एका कारवाईत 4 लाख 49 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यात धर्मदास राजाराम हिंगणेकर वय (35)रा दुधडेरी सावरकर वॉर्ड चंद्रपूर, रामकृष्ण लक्ष्मण सोरते वय (49) रा-ता-जिल्हा चंद्रपूर असे पुन्हा दोन आरोपीना अटक करण्यात आले आहे.
मागील 10 ते 15 दिवसांपासून मुलचेरा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. तालुक्यातील अवैध धंदे असो किंव्हा सुगंधित तंबाखू आणि अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतल्याने दारू व तंबाखू तस्करांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.9 डिसेंबर रोजी रात्रीपासून नाकाबंदी सुरू असताना आज पहाटेच्या दरम्यान एम एच-33 डिके-3031 क्रमांकाच्या टाटा इंडिगो वाहनाला रोखून झडती घेतले असता त्यात 420 संत्रा रॉकेट निपा,किंगफिशर बियर 11 बॉटल, रॉयल स्टॅग 2 लिटर क्षमतेचे 4 बॉटल,ऑफिसर चॉईस ब्लू 60 निपा, रॉयल स्टॅग 180 एम एल चे 90 निपा आढळून आले.विशेष म्हणजे यावेळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर हे स्वतः उपस्थित होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 99 हजार 300 रुपयांचा दारूसाठा आणि 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन असे एकूण 4 लाख 49 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मुलचेरा ते आलापल्ली मार्गावर दररोज कारवाई होत असल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर,एसआरपीएफ चे पोलीस निरीक्षक साळुंखे,ए एस आय रॉय,पोलीस हवालदार विष्णू चव्हाण,पोलीस नाईक गाईन,रोशन पोहणेकर,एसडीपीओ कार्यालयाचे दहिफळे,पाल,पवार,पोलीस अंमलदार जाधव,विक्रांत लांडगे, कठाने,सानप,बिसेन,वेलादी,कदम व महिला पोलीस अंमलदार गोदावरी आणि लाडे उपस्थित होते.