वरोरा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आज डाॅ. आंबेडकर चौक वरोरा येथे जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यास हारार्पण करून अभिवादन केले.
वरोरा काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलतांना खासदार बाळूभाऊ धानोरकर म्हणाले, “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश देत देशातील करोडो वंचित-पददलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणुन समतेची मुल्य बाबासाहेबांनी रूजवली. देशाला आदर्श संविधान देणाऱ्या या महामानवाचे ऊपकार सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी आपल्या भावणा व्यक्त केल्या.
वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, माजी सभापती छोटूभाई शेख, काँग्रेस तालुका महासचिव मनोहर स्वामी,प्रदीप बुराण, महिला काँग्रेस अध्यक्षा दिपाली माटे, प्रतिमा जोगी, मीना रहाटे, राजू मिश्रा, अनिल झोटिंग, प्रफुल आसुटकर, सनी गुप्ता, सलीम पटेल, राहुल देवडे, विजय पुरी राहुल ठेंगणे अय्युब पठाण, राहील पटेल, राजेंद्र बंसोड आदी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा देत, पुष्प वाहुन काँग्रेस कार्यकर्त्यानी आदरांजली वाहीली.