पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
चंद्रपूर-गोंडपिपरी तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ६६ वर्षीय वृद्धावर पोस्को अंतर्गत गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलीने ६६ वर्षीय वृद्ध आरोपीने दि.(२९) मंगळवारी सकाळी ७.३० वाजता छेड काढल्याची माहिती कुटुंबियांना दिली.कुटुंबीयांनी दुर्लक्ष करत तक्रार देण्याचे टाळून मुलीची समजूत काढली.मुलीने दि.३० बुधवारी आत्महत्या करण्यासाठी विष घेतले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच पीडितेला तात्काळ ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.रुग्णालयातील प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली .मुलीच्या बयाणाच्या आधावर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोस्को अंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहे.