मुलीची छेड काढल्याने गोंडपिपरीत भाजपच्या सरपंचाला तहसील परिसरात युवकांनी दिला चोप
चंद्रपूर-शनिवारी चंद्रपूर कडे एस्टी वर बसून प्रवास करीत असताना सिटवर मुलगी बसल्याची संधी साधत गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा गावचे सरपंच असलेल्या निलेश पुलगमकर यांनी बसमध्ये आपल्या बाजूच्या मुलीला नंबर दे,अशी विनवणी करीत मिळून गोंडपिपरीला परत जाऊ म्हणत मोबाईल नंबरसाठी तगादा लावला.त्यामुळे मुलगी अक्षरशः कंटाळली.चंद्रपूर बस शहरात दाखल झाले.त्यानंतर आ पापल्या कामानिमित्य ती युवती व तो सरपंच निघून गेले.घरी गेल्यावर बसमध्ये झालेला त्रास व घडलेला प्रकार तरुणीने कुटुंबियांना सांगितला.त्याचवेळी रविवारी तहसील कार्यालयासह इतरही कार्यालयाल सुट्टी राहील्या मुळे तो सरपंच गोंडपिपरी शहरात आलाच नाही.सोमवारी कामानिमित्य आले असता तहसील कार्यालय परिसरातच त्याला लाथा बुक्याने त्या तरुनीच्या भावंडांनी चागलाच चोप दिला. शेवटी उपस्थित त्यांच्या मध्यस्थीनंतर या भाजपा पदाधिकाऱ्या ल समज देऊन त्याला सोडून दिले.निलेश पुलगमकर भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष आणि प्रसिध्द एका व्यसनमुक्ती संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता आहे.याशिवाय राज्यपातळीवरील सरपंच संघटनेचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे.स्थानिक एका संघटनेचे सुध्दा तालुका सचिव पद सांभाळ नाऱ्या हा कार्यकर्ता या घटनेनंतर अचानक प्रकाश झोतात आला आहे.घडलेल्या प्रकारची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे.दरम्यान त्या सरपंचाशी संपर्क साधला असता हा केवळ राजकीय डाव आहे.राजकीय वैमनशातून व माझी वाढती लोकप्रियता पाहून बदनाम करण्याचा डाव असून मुलीला मी त्रास दिला नाही.शनिवारी प्रवास केला अजून तक्रार नाही त्यामुळे हा खोटा डाव आहे बदनामीसाठी घडवून आणलेला हा षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया पुलगमकर यांनी दिली.