गोंडपिपरीत संविधान दीन साजरा
गोंडपिपरी:- ओबीसी कृती समिती गोंडपिपरी यांनी सविधानदिन व क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधत दिनांक २७ नोव्हेंबर ला जनता महाविद्यालय प्रांगणात प्रबोधन तथा मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन केले.संविधान दिनी तालुक्यात ओबीसी बांधवांनी ९० किमी मोटर सायकल रॅली आयोजित केली.सायंकाळच्या सत्रात प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांच्या कार्यक्रमाने परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत जोश भरला प्रबोधनाची दोन तास मैफिल रंगली होती.
बाह्य परिवर्तनापेक्षा आंतरिक परिवर्तन महत्त्वाचे आहे समाजात बदल घडवून आणायचा असल्यास सुरुवात स्वतः पासून करावी. समाजात होत असलेले स्त्रियांवरील अन्याय,युवकांना लागलेले व्यसन, धर्म जातीचे राजकारण,अंधश्रद्धा, ओबीसिंवरील अन्याय, सविधानाचे महत्व अनेक बाबींवर प्रबोधनातुन लक्ष वेधले जनजागृती केली सोबतच एखाद्या मंत्र्याला २० पोलिसांची सुरक्षा चालते मग २० विद्यार्थ्यांच्या शाळा का नाही असा प्रश्न प्रबोधन कार्यक्रमातून उपस्थित करत मराठी शाळेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.